धक्कादायक : अनैतिक संबंधात अडसर, पत्नीने केला पतीचा खून !

muder 3

 

मुंबई (वृत्तसंस्था) विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला एका महिलेने आपला प्रियकार व त्याच्या मित्राच्या मदतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतरही नैसर्गिक मृत्यू दाखवून या महिलेने पतीवर अंतिमसंस्कार उरकवून घेतले होते. परंतू गुन्हे शाखेच्या पथकाने सगळा कट अखेर उघडकीस आणला.

 

या संदर्भात अधिक असे की, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला संबंधित मृत्यू नैसर्गिक नसून खून असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवायला सुरवात केली. त्यानुसार सुरुवातीला महिलेच्या प्रियकराला आणि एका रिक्षा चालकाला अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी महिलेलाही पोलिसांनी अटक केली. तपासात आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराने कट रचून खून केल्याचे कबूल केले. महिलेने पोलिसांना सांगीतले की, आपल्या नवऱ्याला सकाळी ४ आणि रात्री जेवनानंतर १० गोळ्या दिल्या. नवरा बेशुद्ध झाल्यानंतर उशीने त्याचे तोंड दाबून खून केला. विशेष म्हणजे हत्येनंतर मृत्यू नैसर्गिक वाटावं म्हणून त्यांनी डॉक्टरकडून नैसर्गिक मृत्यू झाल्याचा प्रमाणपत्रही घेतले. यानंतर महेश विष्णु पटेल यांचा 21 डिसेंबर 2019 रोजी मढ येथील स्मशानभूमीत अत्यंसंस्कारही करुन टाकले. मात्र, अखेर पोलिसांनी या खुनाचा अखेर भांडाफोड केलाच.

Protected Content