नवी दिल्ली-वृत्तसंस्था | प्रेषीत मोहंमद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणार्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्यावर भाजपने कारवाई केली असली तरी याचे आता जागतिक पातळीवर पडसाद उमटतांना दिसून येत आहेत.
भाजपच्या नेत्यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटलंय. अरबच्या दुतावासाने भारताला यासंदर्भात माहितील दिल्यानंतर भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांची हकालपट्टी झाली आहे. नवीनकुमार जिंदाल यांच्यावरही कारवाई करण्यात आली. मात्र या वादाचे आता जागतिक पातळीवर पडसाद उमटत असल्याचे दिसून येत आहे.
अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले आहेत. कॉंग्रेसने यासंदर्भात ट्वीट करत अरब देशांच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. कॉँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. यामध्ये मोदींचे पोस्टर करचाकुंडीवर चिटकवल्याचं त्यांनी म्हटलंय. यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही मोदी आणि भाजपला या देशातलोकशाही मार्गाने पराभूत करूच पण आमचा मोदीविरोध या देशात आहे. मात्र, कचराकुंडीवर आमच्या पंतप्रधानाचा फोटो लावणं, हे आम्हाला स्वीकार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रत्येक भारतीयाने याचा विरोध केला पाहिजे, असं राजपूत यांनी आवाहन केलं आहे. त्यांनी या ट्विटमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना देखील टॅग केले आहे.
दरम्यान, मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे अनेक आखाती देशांमध्ये भारताविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या आखाती देशांमध्ये बहारीन, कतार, कुवेत, इराण आणि ओमानसह अन्य अनेक देशांचा समावेश आहे. यामुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे. तर मध्यपूर्वेतील देशांमध्ये लाखो अनिवासी भारतीयांचे वास्तव्य असल्याने केंद्र सरकारने सतर्कतेची भूमिका घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
मोदी जी से हमारा विरोध देश में है और हम श्री मोदी को भाजपा को लोकतांत्रिक तरीक़े से हरायेंगे।
लेकिन किसी अरब देश के कूड़ेदान पर हमारे देश के प्रधानमंत्री की फ़ोटो ये क़तई अस्वीकार्य है। इसका हर भारतीय को विरोध करना चाहिये
विदेश मंत्री @DrSJaishankar और @MEAIndia संज्ञान ले pic.twitter.com/WmI1HlDge4— Surendra Rajput (@ssrajputINC) June 5, 2022
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.