गिरीश बापट यांना खंडपीठाची नोटीस

औरंगाबाद प्रतिनिधी । मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत फटकारल्यानंतर आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे.

स्वस्त धन्य दुकानाच्या संबंधित एका निकालाच्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. कर्तव्यात कसूर आणि मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका खंडपीठाने गिरीश बापट यांच्यावर ठेवला होता. याच प्रकरणी म्हणजेच बीडच्या गेवराई तालुक्यातील संगम जळगाव गावातील निलंबित रेशन दुकान पुन्हा दुकानदाराला बहाल केल्याच्या प्रकरणी मंत्री बापट यांना नोटीस बजावली आहे. यामुळे या प्रकरणी मंत्री गिरीश बापट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Add Comment

Protected Content