आंतर महाविद्यालयीन वाणिज्य प्रश्‍नमंजुषा उत्साहात

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील बी. पी. आर्टस् ,एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर कोतकर ज्युनियर कॉलेज मध्ये कै. मोतिलालजी मंगलचंदजी अग्रवाल अंतरमहाविद्यालयन वाणिज्य प्रश्‍न मंजुषा स्पर्धा उत्साहात पार पडली.

या प्रश्‍न मंजुषेचे उदघाटन कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील परीक्षा व मूल्यमापन मंडळचे संचालक डॉ बी. पी.पाटील यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब चव्हाण तर डॉ. एम बी. पाटील राजपूत, राजूअण्णा चौधरी, निलेश छोरीया, राजेंद्र अग्रवाल, विजय अग्रवाल, राहुल अग्रवाल सौ खापर्डे मॅडम आदी उपस्थित होते. या वेळी महाविद्यालयाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी केले तर सौ के.एस खापर्डे, प्रा. जे एन बागुल, राजेंद्र अग्रवाल, जे. एम अग्रवाल ,जरीना शेख यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या उदघाटनपर भाषणांत डॉ बी. पी. पाटील म्हणाले कि आजच्या युगात शिक्षण घेऊन पुढे काय असा प्रश्‍न पडतो परंतु महाविद्यालयात होणार्‍या विविध स्पर्धां मध्ये भाग घेऊन आपण आपल्याला सिद्ध केले पाहिजे.

या स्पर्धेच्या दुसर्‍या सत्रामध्ये विजयी संघाना चाळीसगाव येथील चार्टर्ड अकाउंटंट कु. खुशबू वेदमुथा यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले. या प्रसंगी आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांचा कुठलाही विषय असो त्यात आपण मन लावून अभ्यास केला पाहिजे तरच आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो. अध्यक्षीय मनोगतात बाळासाहेब चव्हाण म्हणाले की, विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विविध कौशल्याची गरज आहे. या प्रसंगी विनोद कोतकर, मिलींद देशमुख व स्पर्धेचे दाते ज.मो अग्रवाल हे हजर होते.

चार्टर्ड अकाउंटंट कु. खुशबू वेदमुथा यांच्या हस्ते खालील प्रमाणे पारितोषिके देण्यात आली.

पहिले पारितोषिक रु. १५००/- येथील बी. पी. आर्टस् ,एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेज , चाळीसगाव.
दुसरे पारितोषिक रु. ११००/- जी. डी बेंडाळे महाविद्यालय जळगाव.
तिसरे पारितोषिक रु. ७००/- झेड. बी. पाटील महाविद्यालय धुळे, तर उत्तेजनार्थ पारितोषिक हे एम एम महाविद्यालय पाचोरा यांना मिळाले.

उपस्थितांचे आभार उप प्राचार्य ए व्ही काटे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी केले.

Add Comment

Protected Content