कन्नड घाटातून एकाची दुचाकी लांबविली

 चाळीसगाव ग्रामीण पोलीसात नोंद

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील लोंढे येथील तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी कन्नड घाटातून चोरी केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मांगु राठोड (वय-२५) रा.लोणजे ता. चाळीसगाव हे कामाच्या निमित्ताने २३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास कन्नड घाटाच्या पहिला वळणावर त्यांनी दुचाकी (एमएच १९ डीएफ ५१६८) पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेले ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी गणेश राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे करीत आहे.

Protected Content