सुरत अग्निकांड : मृतांची संख्या 23 वर ; ओळख सुद्धा पटविणे अशक्य

surat 43 news 1558705243 618x347

सुरत (वृत्तसंस्था) सरथाणा जकातनाका येथे तक्षशिला आर्केडमध्ये लागलेल्या आगीत मृतांची संख्या 23 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे रुग्णालयातील 7 जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ही आग इतकी भयंकर होती बाहेर काढलेल्या मृतदेहांची ओळख सुद्धा पटवीता येत नाहीय. शुक्रवारी सायंकाळी पावणे चार वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती.

 

या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या जाह्नवी चतुरभाई वसोया (18) आणि कृती निलेश दयाल (17) यांची ओळख त्यांच्या हातावरील घड्याळांवरून पटली. काही दिवसांपूर्वी या दोन्ही मुलींना त्यांच्या कुटुंबियांनी नवीन वॉच घेऊन दिल्या होत्या. यासोबतच 18 वर्षांची ईशा खडेला ड्रॉइंग शिकण्यासाठी आली होती. तिच्या वडिलांनी तिचा मृतदेह शोधण्यासाठी मोबाईलवर रिंग दिली. तेव्हा एका कर्मचाऱ्याने फोन उचलला आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला. स्मीमेर रुग्णालयात एकानंतर एक 10 रुग्णवाहिका आल्या. त्यामधून 30 मिनिटांत 17 मृतदेह रुग्णालयात आणले गेले. ते सर्वच मृतदेह चादरींमध्ये आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळले होते. त्या सर्वांच्याच नातेवाइकांनी आप-आपल्या मुला-मुलींना शोधण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली. अनेकांच्या मुला-मुलींचे मृतदेह त्यांच्या डोळ्यांसमोर होते. पण, त्यांना ओळखता येत नव्हते.

Add Comment

Protected Content