लक्झरीला वाहन धडकले: एक ठार; सहा जण गंभीर जखमी

वरणगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कपिलनगर वस्ती जवळ राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसला अवजड वाहनाने दिलेल्या धडकेत एक प्रवासी जागीच ठार झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे क्रमांक ६ चे काम सुरू आहे त्यामुळे रहदारी अडथळा निर्माण होत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. असाच एक अपघातकाल मध्यरात्री बाराच्या सुमारास घडला. भुसावळ तालुक्यातील कपिल नगर वस्ती येथे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास अवजड वाहन व ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एक जण ठार व सहा जण गंभीर जखमी झाले आहेत

कपिल नगर वस्तीजवळ हवेच्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सध्या सुरू आहे ते मुंबईहून येणार आहे ट्रॉली व सुरतला जाणारी ट्रॅव्हल्स या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात मध्यरात्री झाला या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे आहेत. यातील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Protected Content