केंद्र सरकारच्या निषेधार्थ पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन (व्हिडिओ)

पाचोरा, नंदू शेलकर  । पाचोरा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या ज्वलंत मागण्यांच्या संदर्भात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचे विरोधात तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक यांना जीवन जगावे लागत आहे. या कठीण परिस्थितीत आमच्या जीवन-मरणाशी संबंधित मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी सदरचे धरणेआंदोलन छेडण्यात आले. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, न. पा. गटनेते संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, जिल्हा प्रवक्ते खलिल देशमुख, तालुका अध्यक्ष विकास पाटील, भडगाव तालुका अध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष अजहर खान, पंचायत समिती सदस्य ललित वाघ, जिल्हा उपाध्यक्ष शालिग्राम मालकर, अजय अहिरे,  नगरसेवक अशोक मोरे, रामधन परदेशी, युवक जिल्हा संघटक उमेश एरंडे, जिल्हा सचिव सचिन शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष पंकज गढरी, महिला आघाडीच्या ज्योती संजय वाघ, रेखा देवरे, भडगाव न. पा. नगरसेवका योजना पाटील, भडगाव तालुका अध्यक्षा रेखा पाटील, अमळदे – गिरड गटाच्या जि. प. सदस्या स्नेहा गायकवाड, जिल्हा उपाध्यक्षा सरला पाटील, युवतींच्या अध्यक्षा अभिलाषा रोकडे, सुनिता वारुळे, दिपमाला पाटील, भडगाव युवक अध्यक्ष हर्षल पाटील, गौरव पाटील यांचे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांनी केंद्र सरकारच्या विरोधात बोलतांना सांगितले की, देशातमध्ये हुकुमशाही पध्दतीचे राजकारण सुरू आहे. इंधनदर वाढ गगनाला भिडत आहे. शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या विजेचा प्रश्न तसेच बि – बियाण्यांच्या प्रश्न असेल सर्वच बाबींनी शेतकरी होरपळून निघाला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भावनिक वातावरण निर्माण करुन सर्व सामान्यांच्या भावनांशी खेळुन सत्ता काबिज करण्याचे पाप भाजपा सरकारने सुरू ठेवले आहे. परंतु या नाकर्ते केंद्रातील भाजपा सरकारला येत्या निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवून द्या. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार चांगले करत असतांना केंद्र शासनाने ईडीची चौकशी करण्याचे आदेश दिले असुन या चौकशीत त्यांना काहीच सिध्द करता येणार नाही. असेही आंदोलना प्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले. आंदोलना नंतर नायब तहसिलदार संभाजी पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/498247514781206

Protected Content