कुठल्याही क्षणी औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर होऊ शकते : चंद्रकांत खैरे

chndrakant khaire

 

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादचे नाव संभाजीनगर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही औरंगाबादकरांना सरप्राईज देतील, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.

 

 

कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेले औरंगाबादचे नामांतर अखेर प्रत्यक्षात येणार आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कागदपत्रं मागवून घेतली आहेत. औरंगाबादच्या जनतेला थोड्याच दिवसात सुखद धक्का देणार असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर, उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कोणीही विरोध करणार नाही असंही चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरें यांनीही औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची भूमिका घेतली आहे. त्याबाबत विचारलं असता, “राज ठाकरे हे आत्ता मागणी करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे १९८८ पासून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच उल्लेख करत आहेत. शिवसेनेनेच ही मागणी कायम लावून धरली होती. औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर ठेवले जावे हे तर बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते. त्यामुळे ते स्वप्न उद्धव ठाकरेच पूर्ण करतील इतर कुणालाही ते जमणार नाही” असेही खैरे यांनी म्हटले आहे.

Protected Content