Home राजकीय पुढील आषाढीला अजितदादाच पूजा करणार ! : राष्ट्रवादीच्या या आमदाराचा दावा

पुढील आषाढीला अजितदादाच पूजा करणार ! : राष्ट्रवादीच्या या आमदाराचा दावा

0
31


शिर्डी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी आषाढी एकादशीला अजितदादा पवार हेच शासकीय पूजा करणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

 

शिर्डी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंथन शिबिराला आज सुरुवात होतेय. या शिबिरापूर्वी मिटकरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी मिटकरी म्हणाले की,   जसे आषाढी आणि कार्तिकीची महापूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतात. आज कार्तिकी एकादशीचा दिवस आहे. पांडुरंगाला साक्षी ठेवून सांगतो. येणार्‍या आषाढीची शासकीय महापूजा महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्री करतील. देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री म्हणून शासकीय महापूजा करावी लागली. कदाचित त्यांच्या भाग्यात ही पूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून नसेल. सध्याच्या सरकारबद्दल जनतेच्या मनात प्रचंड रोष, आक्रोश असल्याचेही ते म्हणाले.

 

अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच मुख्यमंत्री आगामी काळात तुम्हाला महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दिसतील.  महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. मला विश्वास आहे शंभरच्यावर आमदार आमचा पक्ष निवडून आणेल. त्यासाठीच वेध भविष्याचा हे मंथन शिबिर आज शिर्डीमध्ये सुरू होते असल्याचे ते म्हणाले.


Protected Content

Play sound