मुक्ताईनगर एमआयडीसीच्या हालचाली गतीमान : मुंबईत आढावा बैठक

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे राज्य शासनाने मंजूर केलेल्या औद्योगीक वसाहतीसाठी हालचाली गतीमान झाल्या असून या अनुषंगाने आज मुंबईत आढावा बैठक घेण्यात आली.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यात एमआयडीसी अर्थात औद्योगीक वसाहत मंजूर झाली असून याबाबत राज्य शासनातर्फे अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली आहे. तालुक्याच्या औद्योगीक वाटचालीला यामुळे चालना मिळणार असून अर्थातच यातून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे.

दरम्यान, एमआयडीसी मंजूर झाल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढील प्रक्रियेचाही पाठपुरावा सुरू केला आहे. या अनुषंगाने गुरूवारी मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार किशोरआप्पा पाटील यांचीही उपस्थिती होती.

या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य शासनाने एमआयडीसी मंजूर केल्यानंतर याची पुढील प्रक्रिया आता गतीमान झाली असून लवकरच येथे प्लॉट अलॉटमेंटसह अन्य बाबी सुरू होणार आहेत. ही प्रक्रिया तात्काळ व्हावी यासाठी माझा पाठपुरावा सुरू असून या माध्यमातून तालुक्याच्या इतिहासाला नवीन वळणार लागणार असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

Protected Content