शहरातील पाणीपुरवठा पाच दिवस बंद

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायत जलशुद्धीकरण केंद्रावरील आवश्यक बांधकामामुळे शहरातील पाणीपुरवठा पाच दिवस बंद राहणार असल्याचे नगरपंचायत पाणी पुरवठा विभाग यांनी सूचित केले आहे.

‘मुक्ताईनगर नगरपंचायत जलशुद्धीकरण केंद्र येथील स्लॅब/ बांधकाम करणे आवश्यक असल्याने जलशुद्धीकरण केंद्रावरून शहरास होणारा पाणीपुरवठा दिनांक २६ मार्च ते ३० मार्च २०२२ रोजी पर्यंत या कालावधीत एकूण पाच दिवस शहरात होणारा पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी नोंद घेऊन नगरपंचायतीस सहकार्य करावे तसेच पिण्याचे पाणी गाळून, उकळून प्यावे. जेणेकरून साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होणार नाही. याची दक्षता घ्यावी.’ असे आवाहन  मुक्ताईनगर नगरपंचायत पाणीपुरवठा विभाग यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content