खळबळजनक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी देत झालेल्या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. त्याच गावातील राहणारा राकेश युवराज जिरे (वय-२२) याने 2021 ते 2022 दरम्यान मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करत आई-वडिलांना व भावाला मारण्याची धमकी देत तिच्या सोबत सोबत अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी ही गर्भवती राहिली. अखेर नातेवाईकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी राकेश युवराज जिरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करत आहे.

Protected Content