फैजपुर येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

faizpurnews

रावेर, प्रतिनिधी। गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन संदर्भात फैजपुर येथे कार्यशाळा सुरु आहे. यामध्ये यशदाचे मास्टर ट्रेनर.जी टी महाजन यांनी मार्गदर्शन केले . यावेळी प्रांतधिकारी अजित थोरबोले, तहसिलदार उषाराणी देवगुणेंची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांअंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगावद्वारा फैजपुर उपविभागस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा सुरु आहे. ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा संदर्भात श्री. महाजन मार्गदर्शन करीत आहे. या कार्यशाळेला रविंद्र पाटील, अक्षय राजनकर यांच्यासह सोळा तलाठ्यांची उपस्थिती असून या कार्यशाळेला रावेरच्या तहसिलदार उषाराणी देवगुणे सुध्दा मार्गदर्शन करणार आहेत.

Protected Content