मेहरूण परीसरातून मुलाला फुस लावून पळविले

crime 2

जळगाव प्रतिनिधी । अंगणात खेळत असतांना १३ वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना शुक्रवार रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल माधव अहिरे रा. साईबाबा मंदीराजवळ, जय जवान चौक, मेहरूण यांचा मुलगा प्रशांत सुनिल अहिरे (वय-१३) हा गुरूवार १३ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास जय भवानी हासस्कुल जवळील मेहरूण तलावाजवळ एकटा फिरण्‍यासाठी गेला. दरम्यान सुनिल अहिरे यांनी मुलाचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांकडे तपास केला मात्र ते मिळून न आल्याने आज सकाळी एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय संदीप पाटील करीत आहे.

Protected Content