मुख्यमंत्री ठाकरे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

udhav

जळगाव प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे उद्या शनिवार १५ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा अधिकृत शासकीय दौऱ्याविषयी माहिती प्राप्त झाली आहे.

शनिवार दुपारी १२.४० वाजता नंदूरबार हेलीपॅड येथून हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रयाण, दुपारी १.२० वाजता जैन हिल्स हेलिपॅड, जळगाव येथे आगमन. दुपारी १.२५ वाजता मोटारीने जैन हिल्सकडे प्रयाण, दुपारी १.३० वाजता आकाश, जैन हिल्स येथे आगमन, दुपारी १.३० पद्यश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण सोहळा, दुपारी ३ वाजता मोटारीने जैन हिल्स हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी ३.०५ वाजता जैन हिल्स हेलिपॅड येथे आगमन. दुपारी ३.१० हेलिकॉप्टरने मुक्ताईनगर, जि.जळगावकडे प्रयाण. दुपारी ३.२५ वाजता संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय हेलिपॅड, ता. मुक्ताईनगर येथे आगमन, दुपारी ३.३० मोटारीने सभास्थळ संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, बऱ्हाणपुर रोडकडे प्रयाण, दुपारी ३.३५ वाजता सभास्थळ, संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय जवळील मैदान येथे आगमन, दुपारी ३.३५ वाजता भव्य शेतकरी मेळावा, सायंकाळी ४.४५ वाजता मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण, सायंकाळी ४.५० वाजता हेलिपॅड येथे आगमन, सायंकाळी ४.५५ वाजता हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, सायंकाळी ५.१० वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन, सायंकाळी ५.१५ वाजता विमानाने नाशिककडे प्रयाण.

Protected Content