काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची शहिदांना आदरांजली

मुंबई प्रतिनिधी । प्रदेश काँग्रेसतर्फे आज शहिदो को सलाम दिवस साजरा करण्यात येत असून याच्या अंतर्गत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी आज हुतात्म्यांना आदरांजी अर्पण केली.

चीनबाबतचे कुचकामी धोरण व अन्यायी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारला जाब विचारणार असल्याची घोषणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कालच केली होती. चीनने सीमेवर आगळीक करून आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्‍वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला तसेच चीनी सैन्याने सीमा ओलांडली नाही अशी चीनला फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी देशाचा तसेच आपल्या शहीद जवानांचा अपमान केला आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करत आहे. यात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा,शहीद स्मारक किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकासमोर एकत्र येऊन मेणबत्या पेटवून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेने हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली होती.

या अनुषंगाने, प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ चीन सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पक्षाचे अन्य नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content