कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्दितीय नामविस्तार दिनानिमित्त उद्या मंगळवार ११ ऑगस्ट रोजी गुजरातच्या वल्लभ विद्यानगर येथील सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.शिरीष कुलकर्णी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

 

११ ऑगस्ट २०१८ रोजी विद्यापीठाचा नामविस्तार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा करण्यात आला. या व्दितीय नामविस्तार दिनानिमित्त उच्च शिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर कुलगुरु प्रा.शिरीष कुलकर्णी हे उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता ऑनलाईन बोलणार असून कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांची उपस्थिती यावेळी असेल. झूम अॅपव्दारे हे व्याख्यान होणार असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी दिली.

Protected Content