जळगाव रेल्वे स्थानकात ३०६ विना तिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

WhatsApp Image 2019 12 20 at 7.05.39 PM

भुसावळ, प्रतिनिधी | विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आर. के. शर्मा आणि सहाय्यक व्यवसाय व्यवस्थापक अजय कुमार (टी. जा.) यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट तपासणी करण्यात आली. जळगाव स्थानकातील तिकिट तपासणीत ३०६ प्रवासी अनियमित प्रवास करत असल्याचे आढळून आले. या प्रवाशांकडून एकूण १ लाख ५० हजार २२० रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला.

तिकीट तपासणीत एकूण २८ तिकीट तपासणी पथके, आरपीएफ कर्मचारी २ तर्फे कारवाई करण्यात आली. दंड भरण्यासाठी असमर्थ असलेल्या ५ प्रवाशांवर कलम १३७ नुसार खटला चालविला गेला. तसेच दंड भरण्यास असमर्थ असणारे ३ प्रवाशांवर कलम १४४ अन्वये कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये एटीएस पथकासह वाय.डी.पाठक (मुख्य तिकीट निरीक्षक तपासणी), प्रा. सुरक्षा पथक, आयसीपी चेक, सजंग पथक, ओडी स्टाफ व इतर तिकिट तपासणी कर्मचारी उपस्थित होते. या मोहिमेमध्ये, विना तिकीट प्रवास करणारे ८४ केसमध्ये ४३ हजार ९२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अनियमित प्रवास प्रकरणे २२२ जणांकडून १ लाख ६३ हजार रुपये दंड आकारला गेला.

Protected Content