सिंधी कॉलनीतील नेत्रज्योती हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । संत बाबा गुरूदासराम यांच्या ९० व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधी कॉलनीतील नेत्र ज्योती हॉस्पिटलतर्फे आज मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यात डोळे, दात, जनरल तपासणी आणि फिजोओथेरपी तपासणी करण्यात आली. अशी माहिती अध्यक्ष गुरूमुख जगवानी यांनी दिली.

सविस्तर माहिती अशी की, संत बाबा गुरूदासराम यांच्या ९० व्या जन्मोत्सवानिमित्त जळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात आज सिंधी कॉलनी परिसरातील नेत्र ज्योती हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यात डोळे तपासणी, दंत तपासणी, जनरल तपासणी आणि फिजिओथेरपी असे शिबीर घेण्यात आले. आज सकाळी ९ वाजता संत बाबा गुरूदासराम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गुरूमुख जगवाणी यांच्याहस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान घेण्यात आले. यावेळी आरोग्य तपासणी शिबीराबरोबरच रक्तदान शिबीरही घेण्यात आले.

शिबीरातील मोतीबिंदू रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. यासाठी डॉ. तुषार बोरोले, औरंगाबाद येथील ओरल सर्जन तज्ञ डॉ. दिपक मोटवानी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी संत बाबा गुरूदासराम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गुरूमुख जगवानी, उपाध्यक्ष दिलीपकुमार मंधवानी, सचिव डॉ. मुलचंद उदासी यांच्यासह हॉस्पिटलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content