स्फोटक पदार्थ टाकल्यानेच लागली आग; गोडावून मालकाने दिली तक्रार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील जी सेक्टरमधील रॉयल एजन्सीज ऑरग्यनिक फूडस कंपनीच्या गोडावूनमध्ये एकाने खिडकीतून ज्वलनशिल पदार्थ टाकून दिल्याने लागलेल्या आगीत आईसक्रीम, तीन मोठी डीप फ्रीझर, ईलेक्ट्रीक पॅनल, स्टार्टर असा एकुण सुमारे १७ लाख ९२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना सोमवार १ एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता घडली होती. याप्रकरणी रविवारी ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हुसेन अब्दुलभाई बोहरी वय ४१ रा. कासमवाडी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. आईसस्क्रीमचा एजन्सी चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये रॉयल एजन्सीज ऑरग्यनिक फूडस कंपनीचे गोडावून आहे. या ठिकाणी आईसक्रीमचा साठा ठेवला होता. दरम्यान, त्यांच्या गोडावूनच्या बाजूला निधी इंटरप्रायझेस कंपनीचे मालक राजेश नेमीचंद कोठारी यांनी एकत्रित असलेल्या खोलीच्या खिडकीचा काच फोडून ज्वलनशिल पदार्थ गोडावून मध्ये टाकल्याने भीषण आग लागल्याची घटन सोमवार १ एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता घडली होती. या आगीत आईसक्रीम, तीन मोठी डीप फ्रीझर, ईलेक्ट्रीक पॅनल, स्टार्टर असा एकुण सुमारे १७ लाख ९२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमालजळून खाक झाला. दरम्यान याप्रकरणी हुसेन अब्दुलभाई बोहरी यांनी निशा इंटरप्रायझेस कंपनीचे मालक राजेश नेमीचंद कोठारी यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार चौकशी अंती रविवारी ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.

Protected Content