अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील आडगाव शिवारातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलीस पथकाने कारवाई केली आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासोदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील आडगाव शिवारात अवैधपणे वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती कासोदा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवार २ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता धडक कारवाई करत ट्रॅक्टर क्रमांक (एमएच २८ टी ८०५१) तपासणी केली असता. वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नव्हता. यासंदर्भात पोलिसांनी वाळूचे ट्रॅक्टर जमा करून कासोदा पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करण्यात आले आहे. पोहेकॉ जितेश पाटील यांच्या फिर्यादीवरून शाहीद जहूर टकारी (वय-२४) आणि शेख इसाक शेख लतीफ मिस्‍तरी (वय-४४) दोन्ही रा. उत्राण ता. एरंडोल यांच्या विरोधात कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युवराज कोळी करीत आहे.

 

Protected Content