टाकरखेडा शाळेत मतदान जनजागृतीपर रंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेत आज दिनांक ८/४/२०२४ सोमवार रोजी लोकसभा निवडणूक २०२४ संदर्भात मतदान जनजागृतीपर रंगभरण स्पर्धा गटशिक्षणाधिकारी आर. ए. लोहार, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे, शापोआ अधिक्षक व्ही. व्ही. काळे, शहापूर केंद्राचे केंद्रप्रमुख विकास वराडे तसेच टाकरखेडा शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केली होती. एकूण १६४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रंगभरण स्पर्धा घेण्यासाठी शाळेतील उपशिक्षक जयंत शेळके, श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती छाया पारधे, श्रीमती निर्मला महाजन, नाना धनगर, रामेश्वर आहेर तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे –

इयत्ता १ली :- १) माही देविदास भोई (प्रथम) २) रिया सलीम तडवी (द्वितीय) ३) प्रिया किरण सुरळकर (तृतीय)

इयत्ता २ री :- १) तन्वी सुधाकर गोसावी (प्रथम) २)भाग्यश्री प्रवीण आगळे (द्वितीय) ३)तेजस्विनी रमेश रावत (तृतीय)

इयत्ता ३री :- १) कांचन संदीप भोई (प्रथम) २) योगेश्वरी गजानन भोई (द्वितीय) ३) समीर मुनाफ तडवी (तृतीय)

इयत्ता ४थी:- १) रिया गोपाल दांडगे (प्रथम) २) पियुष निवृत्ती शिंदे (द्वितीय) ३) सुनाक्षी विजय सुरळकर (तृतीय) ४) ललिता नितीन भोई (उत्तेजनार्थ)

इयत्ता ५ वी:- १) वृषाली देवानंद डाकोरकर (प्रथम)  २) महेश ज्ञानेश्वर पडोळ (द्वितीय)  ३) अमृता समाधान सुरळकर (तृतीय)  ४) नंदिनी शांताराम लोहार (उत्तेजनार्थ)

इयत्ता ६ वी :- १) दिशा गोपाल दांडगे (प्रथम) २) राजश्री गणेश डोंगरे (द्वितीय) ३) नैतिक मोहन डोंगरे (तृतीय)

इयत्ता ७वी :- १) अनुष्क श्रावण भोई (प्रथम) २) नम्रता ज्ञानेश्वर बोराडे (द्वितीय)  ३)वैष्णवी संदीप भोई (तृतीय)

 

Protected Content