बेंगळुरू (वृत्तसंस्था) कर्नाटक राज्यातील कुनिगल टक येथे दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात तब्बल १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तामिळनाडूतील होसुरू मार्गाने ट्रेवेरा येथील यात्रेला हे भाविक गेले होते. तेथून परतत असताना कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील कुनिगल टक येथे भरधाव वेगात असलेली भाविकांची कारच्या चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार डिव्हायडर तोडून त्याचवेळी समोरून येणाऱ्या कारला वेगात धडकली. त्यामुळे १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.