कमी कोरोना संक्रमणाचा आज सलग पाचवा दिवस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात आज कोरोना संक्रमणाच्या आकड्यानं ५६ लाखांचा टप्पा ओलांडलेला दिसतोय. २३ सप्टेंबररोजी सकाळी आरोग्य मंत्रालयानं अपडेट आकडेवारी जाहीर केली. गेल्या २४ तासांत ८३ हजार ५२७ संक्रमित समोर आले आहेत. तर याच काळात जवळपास ८९ हजार ७४६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचं सांगण्यात आलंय. आज सलग पाचव्या दिवशी संक्रमणातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या नव्या संक्रमितांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.

देशात आत्तापर्यंत एकूण ५६ लाख ४६ हजार ०१० जणांना संक्रमणानं गाठलंय. जवळपास ४५ लाख ८७ हजार ६१३ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलीय. तर या व्हायरसमुळे एव्हाना ९० हजार ०२० जणांना प्राण गमवावे लागलेत.

देशाचा रिकव्हरी रेट ८१.२५ टक्क्यांवर आहे. एकूण उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १७.१५ टक्के म्हणजेच ९ लाख ६८ हजार ३७७ वर आहे. तर भारतात मृत्यू दर १.५९ टक्के आहे. भारतात होणाऱ्या एकूण चाचण्यांपैंकी पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांचा दर (पॉझिटिव्हिटी रेट) ८.७५ टक्के आहे. देशात गेल्या २४ तासांत ९ लाख ५३ हजार ६८३ सॅम्पल्सच्या चाचण्या पार पडल्या.

Protected Content