शेतकर्‍यांचे आंदोलन हा तर पब्लीसिटी स्टंट ! : आठवले

मुंबई प्रतिनिधी । एकीकडे देशभरात शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढत असतांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हे आंदोलन म्हणजे पब्लीसिटी स्टंट असल्याची टीका केली आहे.

नव्या कृषी कायद्यांविरोधात आणि विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला हजारो शेतकर्‍यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. शेतकर्‍यांच्या या मोर्चाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले की, मुंबईतील शेतकर्‍यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी ही टीका केली आहे.

आठवले पुढे म्हणाले की, मोदी काही शेतकरी विरोधी नाहीत. कायदा सरकारने केला आहे, मागे घेण्याचा प्रश्‍नच नाही. शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या ऐकून त्यानुसार काम देखील केलं गेलं आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आंदोलन थांबवायला हवं, असं रामदास आठवले म्हणाले.

Protected Content