कर्नाटक विधानसभा स्थगित ; भाजप आमदार रात्रभर करणार सभागृहात धरणं आंदोलन

D wXNHcWwAAuUtr

 

बेंगळुरू (वृत्तसंस्था) कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी आजसाठी विधानसभा स्थगित केल्यामुळे राज्यातील सत्ता संघर्ष तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. कारण आजच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यावे या मागणीसाठी भाजप आमदार रात्रभर सभागृहातच धरणे आंदोलन करणार आहेत. तर विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा पुन्हा उद्या सकाळी ११ वाजल्यापासून विधानसभेत सुरु होणार आहे.

 

सुमारे दोन आठवडे सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. या दरम्यान, सदनात बंडखोर आमदारांसह १९ आमदार गैरहजर राहिले. राज्यपालांनी रमेश कुमार यांना लिहिले की, ‘विश्वासदर्शक ठराव यावेळी सभागृहाच्या विचाराधीन आहे. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की ते सभागृहाच्या विश्वासास कायम पात्र राहतील. आज दिवस संपेपर्यंत विश्वासदर्शक प्रस्तावावर मतदान घेण्याबाबत विचार करा. काँग्रेसने राज्यपालांच्या अशा हस्तक्षेपाबाबत आक्षेप घेतला आहे. राज्यपालांनी संविधानानुसार सदनाच्या कामकाजात दखल द्यायला नको, असे काँग्रेसचे आमदार एच.के. पाटील म्हणाले. कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकारचे भविष्य काय असेल याचा निर्णय आज रात्रीपर्यंत लागण्याची शक्यता होती. मात्र, आता उद्या सकाळपर्यंत वाट बघावी लागणार आहे.

Protected Content