एरंडोल येथे भाजीपाला खरेदी-विक्री केंद्राचा शुभारंभ

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल कृषी विभागातर्फे “शेतकरी ते उपभोक्ता”या संकल्पनेनुसार येथे आदर्श नगरात दत्त मंदिरानजीक भाजीपाला विक्री खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. उंबरे येथील शेतकरी बचत गट यांच्यामार्फत भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.

सुरुवातीला प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी धरणगाव येथे स्वतः’शेतकरी ते उपभोक्ता’ या संकल्पना केंद्राचे उद्घाटन केले.एरंडोल, धरणगाव व पारोळा येथे ही केंद्रे उघडण्यात आली असल्याचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी सांगितले व सदर केंद्रामुळे गर्दी कमी होण्यास नक्की मदत होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. या केंद्राच्या शुभारंभप्रसंगी तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे यांनी सदर उपक्रम शासनाने शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेऊन तो अधिकृत बचत गटाला द्यायचा आहे व ते बचत गट तो माल ग्राहकांना त्यांच्या घरपोच करणार असल्याचे सांगितले व त्यासाठी येत्या काही दिवसांत शहरातील प्रत्येक नविन वसाहतींमध्ये व्हॅट्सअप ग्रुपद्वारे हा भाजीपाला पोहचवणार असल्याचे सांगितले. यावेळी कृषी सहाय्यक धनंजय सावंत, परमेश्वर बेडगे, कुंदन पाटील, उमाजी मुरमुरे, वैभव पाटील, ईश्वर सोनार, नागरिक उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content