जळगावात भरदुपारी अज्ञातांनी पेटविली दुचाकी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील भास्कर मार्केटमध्ये गॅरेज समोर उभ्या असलेली दुचाकीला अज्ञातांनी भरदुपारी पेटवून दिल्याचा प्रकार आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडला. पालिकेच्या अग्निशमन बंबाच्या मदतीने ही आग विझविली.

याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यात संचारबंदी असल्याने शहरातील सर्व दुकाने व मार्केट बंद आहेत. याचा गैरफायदा घेत शहरातील भास्कर मार्केट मधील एका गॅरेज समोर उभ्या असलेल्या तीन दुचाकीतील एका मोपेड दुचाकीला अज्ञात टवाळखोरांनी मोपेड गाडी पेटवून दिल्याचा प्रकार आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडला. आग लागल्याचे पाहून नागरीक आणि जिल्हा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या मदतीने ही आग विझविली. विशेष म्हणजे घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर जिल्हापोलीस ठाणे आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसांत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. मात्र ही आग लावणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content