नवीन महाविद्यालय, वाढीव तुकड्याच्या प्रस्तावास मुदतवाढ देण्याची मागणी

धरणगाव प्रतिनिधी । शहरात नवीन महाविद्यालय, वाढीव तुकड्या, नवीन विद्याशाखा आणि सॅटेलाईट सेन्टर यांचा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत वाढ करावी अशी मागणी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठोचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६, कलम १०९ अन्वये दरवर्षी नवीन महाविद्यालय, नवीन विषय, वाढीव तुकड्या, नवीन विद्याशाखा व सटेलाईट सेंटर सुरू करण्यासाठीचे विविध संस्थांचे प्रस्ताव मागविले जातात. हे प्रस्ताव प्रत्येक विद्यापीठाने अधिष्ठाता मंडळाकडून शिफारस करून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषेदेच्या मान्यतेने १ एप्रिलच्या आत शासनाकडे मान्यतेसाठी पाठवायचे असतात व शासन दरवर्षी १५ जूनच्या आधी या प्रस्तावांना मान्यता देते असे प्रस्ताव विद्यापीठाकडे दाखल करण्यात येते. मात्र यावर्षी “कोरोना”मुळे विद्यापीठ प्रशासनही लॉकडाऊन असल्यामुळे या प्रस्तावांची पुढील प्रक्रिया मुदतीत होवू शकणार नाही, त्यामुळे यावर्षी हे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मुदत वाढवून द्यावी, त्यासाठी विशेष अधिसूचना काढावी अशी मागणी ईमेल द्वारा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. ही मुदत वाढवून दिली तरच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांना पुढील शैक्षणिक वर्षात नवीन अभ्यासक्रम, नवीन विषय सुरू करता येतील. असे देखील व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content