अँड.राजेश झाल्टे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव (व्हीडीओ)

88676d4d 73a7 4983 8df8 9f4ff69bbb2e

 

जळगाव (प्रतिनिधी) येथील ज्येष्ठ विधीतज्ञ अँड.राजेश झाल्टे यांचा वाढदिवस मित्र परिवार आणि निकटवर्तीयांनी आज जल्लोषात साजरा केला. अँड. झाल्टे शुभेच्छा देण्यासाठी घरी आणि कार्यालयात विविध संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.

 

अँड.राजेश झाल्टे यांचा वाढदिवस असल्यानेजळगावमधील त्यांच्या निवासस्थानी आणि मानसिंग मार्केट येथील कार्यालयात सकाळपासूनच विविध संघटना,राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पत्रकार,राजकीय, नाट्य, कामगार संघटना, उद्योग व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही अँड.राजेश झाल्टे यांना भेटून तसेच दूरध्वनीद्वारे अभीष्टचिंतन केले. ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जेन्वळ यांनी देखील श्री. झाल्टे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी युनस खान, अँड.शेख, अँड.मधुकर सपकाळे, अँड. नीता जोशी, श्री.पगारे, श्री. गवई,अँड. कदम आणि गोसवी नाना यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभीष्टचिंतन केले.

 

https://www.youtube.com/watch?v=F-BV0tv3L_o&feature=youtu.be

Protected Content