अमित राज ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड

EO8x70zU8AAYYGl

 

मुंबई (वृत्तसंस्था) मनसेच्या महाअधिवेशनात अखेर आज मोठी घोषणा झाली. अमित राज ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी अधिकृतरित्या निवडण्यात आले आहे.

 

मनसेच्या महाअधिवेशनात अखेर अमित ठाकरे यांचे लाँचिंग झाले. अमित यांची मनसेच्या नेतेपदी निवड केल्याची घोषणा पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर अमित यांचे शाल आणि तलवार देऊन स्वागत केले. अमित ठाकरे यांना संपूर्ण ठाकरे कुटुंबाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. पक्षाच्या नेतेपदी अमित यांच्या नावाची घोषणा होताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यापूर्वी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीतच त्यांना राजकारणात आणण्याचा विचार होता. परंतु, गंभीर आजारामुळे तो कार्यक्रम टाळण्यात आला. परंतु, 23 जानेवारी रोजीच्या महाअधिवेशनाच्या दिवशी त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांनी आपल्या भाषणात बोलताना वडील राज ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच नेतेपदी निवड होणार अशी माहिती दिल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी आपल्या वडिलांसह कुटुंबियांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. तर शर्मिला ठाकरे यांनी आपल्या मुलाची म्हणजेच अमित यांची मोबाइल कॅमेऱ्यात छबी टिपली. यावेळी त्यांच्यासह अमित यांची पत्नी मिताली आणि बहीण उर्वशी या देखील भावूक झाल्या होत्या.

Protected Content