मनसेची ‘चलो इडी कार्यालय’ रणनीती ; विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही हजर राहण्याचे आवाहन

raj thackeray at vani maharashtranama

 

मुंबई (वृत्तसंस्था) सत्ताधारी भाजप हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात द्वेषातून कारवाई करत असल्याचा आरोप करणाऱ्या मनसेने ‘ईडी’च्या नोटिशीला अफलातून पद्धतीने उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांच्या ‘ईडी’च्या चौकशीच्या वेळी, २२ ऑगस्ट रोजी मनसेचे सर्व कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर थांबणार आहेत. अन्य विरोधी पक्षांचे कार्यकर्तेही यावेळी हजर राहू शकतात, असे माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सामान्य माणसांना, नोकरदार वर्गाला त्रास होता कामा नये ही आमची भूमिका आहे. २२ ऑगस्टला आम्ही सगळे ईडी कार्यालयात जाणार मात्र आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. २२ ऑगस्टला मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडी कार्यालयासमोर हजर राहणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकही असणार आहेत. मनसेचे शक्तीप्रदर्शन यावेळी केले जाईल. मात्र सामान्य माणसांना, नोकरदार वर्गाला त्रास होऊ नये असे आमचे आवाहन आहे. नेमके किती समर्थक येतील याचा अंदाज नाही असेही बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

 

 

Protected Content