यावल येथे भारतीय जनता पक्षातर्फे पश्चिम बंगाल येथील हिंसाचाराचा निषेध

 

यावल,  प्रतिनिधी  । येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने  पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निकालानंतर सत्ताधारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून, यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना लक्ष केले जात असून याचा तहसीलदार यांना निवेदन देऊन तीव्र शब्दात  निषेध व्यक्त करण्यात आला. 

 

पश्चीम बंगाल येथे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात उसळलेल्या राजकीय हिंसाचाराचा भाजपातर्फ जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या हिंसाचाराचा निषेध करणारे निवेदन तहसीलदार  महेश पवार यांना  भारतीय जनता पक्षातर्फे देण्यात आले.  याप्रसंगी भाजपा यावल तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे,भाजपा किसन मोर्चा जिल्हाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक नारायण चौधरी, यावल नगर परिसदेचे भाजपा नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे,जेष्ठ कार्यकर्ते पी. एस. सोनवणे, भाजपाचे यावल शहराध्यक्ष निलेश गडे, भाजप युवा मोर्चा तालुका सरचिटणीस- व्यंकटेश बारी, उदय बाविस्कर, तालुका चिटणीस,अतुल भालेराव,शहर सरचिटणीस परेश नाईक,राहुल बारी,योगेश वाणी,सलीम तडवी सर, भूषण फेगडे, रितेश बारी, अविनाश बारी आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Protected Content