उत्तर महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे वरणगावमध्ये आयोजन (व्हिडिओ)

वरणगाव दत्तात्रय गुरव | येथे उत्तर महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२१ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये १६० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. ‌‌

 

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील जळगाव जिल्हा पॉवर लिफ्टींग असोसिएशन व दि वरणगाव फिटनेस हब यांच्यावतीने बोदवड रोड वरील पावर हाऊसच्या शेजारी उत्तर महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२१ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये अहमदनगर नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या पाच जिल्ह्यातील महिला पुरुष १६० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धा चार गटांमध्ये विभागल्या गेल्या असून प्रत्येक गटासाठी तीन बक्षिसे ठेवण्यात आली असून यामध्ये गोल्ड मेडल व सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/306478921120503

Protected Content