वरणगाव आयुध निर्माणीत भीषण आग ! : तीन तासांनी मिळवले नियंत्रण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगाव येथील आयुध निर्माणीत आज सायंकाळी भीषण आग लागली असून तीन तासांनी यावर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

वरणगाव येथील आयुध निर्माणीच्या परिसरात आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. प्राप्त माहितीनुसार, ऑर्डनन्स फॅक्टरीच्या सुरक्षा भिंतीजवळ आग लागली. कडाक्याचे उन आणि वार्‍यामुळे ही आग क्षणार्धात दूरवर पसरली. आगीची माहिती मिळताच वरणगाव आयुध निर्माणीसह दीपनगर, भुसावळ, वरणगाव आणि जळगाव येथून अग्नीशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. आग मोठी असल्याने मोठ्या प्रयत्नांनी साडेसात वाजेच्या सुमारास यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविता आले.

दरम्यान, जिल्हाधिकारी अमन मित्तल व नाशिक विभागाचे वनसंरक्षण गजेंद्र हिरे यांनी वरणगाव आयुध निर्माणीला भेट देऊन पाहणी केली. याबाबतची अधिकृत माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे. यात कोणतीही हानी झाली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content