ठेकेदाराच्या आडमुठेपणा : जलकुंभ कोसळण्याची भीती (व्हिडिओ)

वरणगाव दत्तात्रय गुरव  ।  भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे नविन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत विकास कॉलनीतील पुर्वीपासुनच्या जलकुंभा शेजारी अगदी फाउंडेशनजवळ नविन जलकुंभा उभारणीचे कामासाठी  ठेकेदारामार्फत मागील तीन आठवड्यांपासून खोदकाम करण्यात आले असून येथे पाणी झिरपत असल्याने भरवस्तीत असलेला जलकुंभ कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहे. 

 

नविन जलकुंभासाठी ठेकेदाराने गेली तीन आठवड्यांपासुन खोदकाम करून ठेवले आहे. त्यामूळे सततधार नैसर्गीक प्रवाहाचे पाणी त्या ठिकाणी झीरपत असल्याने तो भर वस्ती मधील उभा असलेला जलकुंभ  कोणत्या क्षणी कोसळू शकतो. यामूळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात असून ठेकेदाराच्या आडमुठे धोरणाचा पालिका अधिकाऱ्यांनी विचार वरून नागरीकांच्या सुरक्षेचे गांभिर्य लक्षात घ्यावे अशी मागणी होत आहे. वरणगाव येथे नविन पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन ठेकेदाराकडून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याचा सर्व नागरीकांना उपयोग व्हावा या दृष्टीने पालिका स्तरावरून नियोजन करण्यात आले आहे. त्याच दृष्टीने वरणगाव नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक १ मधील वरणगाव फॅक्टरी खरगॉन कडील पवन नगरात पिण्याचे पाणी पोहचवण्याकरीता येथील प्रभाग क्रमाक ३ मधील विकास कॉलनीत जुन्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या एक लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभा शेजारी तत्कालीन सन २००२ मध्ये ग्रामपंचायतच्या कार्यकाळात बांधकाम करण्यात आलेल्या शुद्ध पाणी साठवण्या करिता उपयोगी येणारा ३० हजार लिटरचा ‘सम’ ठेकेदाराने तोडून त्या जागेवर नविन योजनेतील दोन लाख लिटरचा जलकुंभ बांधकाम करण्याचे नियोजन केले आहे. पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली असुन पवननगरकडे जाणाऱ्या मार्गाने जलवाहीन्या अंथरल्या जात आहेत.  मात्र विकास कॉलनीत ठेकेदाराचा आडमूठेपणा भोवणार असल्याचे संकेत आहेत.  गेली तीन आठवडे झाली जून्या जलकुंभा शेजारी अगदि  फाँऊण्डेशन उघडे पाडून खोदकाम करून ठेवले आहे. सततधार नैसर्गीक प्रवाहाचे पाणी त्या खडडयात मुरत असून जलकुंभ कोणत्या क्षणी कोसळण्याची शक्यता असल्याने भीती व्यक्त होत आहे. हा जलकुंभ भर वस्तीत असून रस्त्याला लागून आहे. यामूळे मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.  ठेकेदार वर्क ऑर्डरप्रमाणे काम करत नसुन स्वतःचा आडमुठेपणा वापरत असल्याचा नागरीकांनी आरोप केला आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/895180764369134

 

Protected Content