“कशाला हवे ड्राय डे ?”… :डॉ. नितु पाटील यांचा प्रश्न ‘बघा पटत आहे का ? ( भाग ७ )

 

जळगाव (प्रतिनिधी) पिने वालो को पिने का बहाना चाहिये …मग कशाला हवे ड्राय डे…ड्राय डे ला मद्य मिळत नाही यावर आपला विश्वास आहे का? डॉ. नितु पाटील यांच्या बघा पटत आहे का ? ( भाग ७ ) या सदरातून “कशाला हवे ड्राय डे ?”…त्यांच्याच शब्दात…!

महान राष्ट्र पुरुष,संतांच्या आदी समान्नार्थ असे दिवस लादले जातात,पण ज्यांनी जन्मभर अश्या कुगुणापासून दूर राहा असा सल्ला दिला,तो पाळण्यासाठी फक्त एक दिवस आणि बाकीचे दिवस मोकळे ….कशाला एक दिवस पण महसुलात घट करायची,शेवटी महसूल असेल तर विकास होणार,आणि मद्यविक्रीपासून मिळणारच खरा महसूल आहे,म्हणून तर परत जोरात दुकाने सुरु झाले. तेव्ह्या सरकाराने असे कोणतेही बंधन न लावता बिनधास्त मद्यविक्री सुरु ठेवावी.त्यामुळे पेट्रोल,डीझेल वर जास्त कर लावुन सामान्य जनतेला होणारा आर्थिक त्रास कमी करता येईल. बर ड्राय डे करायचा असेल तर सर्व जयंती..पुण्यतीथी…धार्मिक सण आदींवर करायची हिम्मत दाखवा…शासन नेमके काहींवरच का मेहेरबान? हा डोंगी ड्राय डे आहे…

 

विकासासाठी निधी नाही मग कशाला हवे ड्राय डे…
तेव्ह्या “ नो ड्राय डे…………..एनी डे इंज अ ड्रिंक डे “

 

असो. राष्ट्रपिता म.गांधी यांच्या जयंती निमित्त शतशः अभिवादन …

 

सदर माहिती जनहितार्थ असल्यामुळे कोणीही शेअर करण्यास हरकत नाही.

डॉ.नितु पाटील,
०८०५५५९५९९९
दि. ०२.१०.२०१७

Protected Content