भुसावळ ग्रामीण रुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भुसावळ प्रतिनिधी । भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भुसावळ ग्रामीण रुग्णालयात प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी डॉ.मयुर चौधरी, वैद्यकिय अधिकारी वाय.टी. महाजन, हरी जाँन, रुग्णालयातील कर्मचारी सागर सोनवणे, धनसिंग पाटील, संजय जेधे, मनोज भोईटे, अधिपरिचारिका प्रणिता पाथरवट, ज्युलिया शिंदे यांच्यासह रुग्णालयात क्वांरन्टाइन असलेले रुग्ण विकास बाविस्कर, निलेश वाणी आदींची उपस्थिती होती. कोरोनाच्या पाश्वभुमीवर शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करीत सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ग्रामीण रुग्णालयातील डॉ.मयुर चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या समाजिक कार्यावर प्रकाश झोत टाकून माहिती दिली.

Protected Content