वाघळुदच्या अनेक तरुणांचा व ग्रामस्थांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील वाघळुद येथील अनेक युवकांनी व ग्रामस्थांनी प्रदेश अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघळुद येथे पक्षाच्या बैठकीत पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी फकीरा गरबड पाटील , गणेश मधुकर सोनवणे , किसन शिवराम पवार , निखिल पंढरी सपकाळे, विकास शंकर काटे , झेंडु चत्रु कोळी , सुरेश दशरथ पाटील, लिलाधर मधुकर सपकाळे , रूपेश सुरेश पाटील , विठ्ठल बाबुराव पाटील , संजय वासुदेव पाटील , गजमल बजरंग भिल्ल, अनिल वामन पाटील, ईश्वर भागवत पाटील , संतोष पंडीत कचरे, ईश्वर झेंडु कोळी यांनी मनसेत प्रवेश केला. तसेच महीला कार्यकर्ता म्हणुन इंदुबाई देविदास पवार, सिंदुबाई पंडीत पाटील , विमल किसन पवार, लिलाबाई एकताथ पाटील, जनाबाई भागवत पाटील व कल्पना पांडूरंग पाटील आदींनी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांशी बोलतांना चेतन अढळकर यांनी पक्षाची भुमिका व ध्ययधोरणांशी अवगत केले. यावेळी पक्षप्रवेशच्या बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावल शहर अध्यक्ष किशोर नन्नवरे, गौरव कोळी यांच्या व्यतिरिक्त इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content