ईडीच्या आडून भाजपचे सूडाचे राजकारण- गृहमंत्री

मुंबई : प्रतिनिधी । राज्यात सीबीआयच्या तपासाला अटकाव केल्यामुळे ईडीच्या आडून भाजप सूडाचं राजकारण करतंय ही गंभीर बाब असल्याचा आरोप आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना अनिल देशमुख म्हणालेत की, भाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ईडीची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला सीबीआय करत होते. परंतु राज्यात चौकशी करायची असेल तर राज्यसरकारची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यामुळे सीबीआयबाबत आता केंद्र काही करु शकत नाही अशी माहितीही अनिल देशमुख यांनी दिली.

ईडीचा ज्यापध्दतीने राजकारणासाठी वापर होतोय. ते पाहून अशा प्रकारचं राजकारण देशात कधी पाहण्यात आलं नाही असेही अनिल देशमुख म्हणाले.

Protected Content