मतदानाच्या दोन दिवसआधी प्रिंट, सोशल मीडियावर प्रचारास बंदीची शक्यता

नवी दिल्ली (प्रतिनिधी) निवडणुकीत मतदानाच्या 48 तासाआधी उमेदवारांना प्रचारास बंदी असते. त्याचप्रकारे सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियावर प्रचारास बंदी घालण्यत यावी, अशी सूचना निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाला केली असल्याचे वृत्त आहे.

 

दरम्यान,निवडणूक आयोगाच्या पत्रावर विधी मंत्रालयाने अजुन तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याचे कळतेय. निवडणुकीच्या काळात सेक्शन 126 नुसार, 48 तासांपूर्वी जाहीर सभा, रॅलीच्या माध्यमाने प्रचार करण्यास मनाई असते. मात्र उमेदवाराकडून प्रिंट मीडिया, सोशल मीडियावर जाहिराती देऊन प्रचार केला जातो. त्यामुळे निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाला याबाबत पत्र पाठवले आहे. शिवाय लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही पत्रात म्हटले आहे. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. आगामी दोन महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Add Comment

Protected Content