इसिसची भारतासह अफगाणिस्तान, बांग्लादेश, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंकेत हल्ल्याची योजना ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दहशतवादी संघटना इसिस भारतासह अफगाणिस्तान, बांग्लादेश, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंकेत हल्ल्याची योजना आखत आहेत. इसिसला हक्कानी नेटवर्कचीही साथ आहे. हक्कानी नेटवर्क पाकिस्तानची गुप्तचर एजन्सी आयएसआयIच्या इशाऱ्यावर काम करते.

संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टमधून हा दावा करण्यात आला आहे. या अहवालानुसार इराकमधील इस्लामिक स्टेट आणि त्याची सहकारी संघटना खोरासनचा नवा म्होरक्या शिहब अल मुजाहिर यांनी मिळून भारतासह आशियातील अनेक देशांत हल्ला करण्याचा कट रचत आहेत.

संयुक्त राष्ट्राचे महासचिव एन्टोनिया गुटेरेसने यांनी स्वत: या रिपोर्टबाबत माहिती दिली आहे. इसिसचे २ हजार दहशतवादी पूर्ण अफगाणिस्तानात पसरले आहेत. या संघटनेनं जगभरात अनेक हल्ले केले आहेत. या संघटनेनं नोव्हेंबरमध्ये काबुल विद्यापीठावरही हल्ला केला होता.

इसील -के जवळही २२०० दहशतवादी आहेत. हे दहशतवादी अफगाणिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये पसरले आहेत. शिहब अल मुहाजिरला जून २०२० मध्ये संघटनेचा नवा म्होरक्या म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. अफगाणिस्तान, भारत आणि बांग्लादेशसह अन्य आशियाई देशांत तो हल्ला करु इच्छित आहे.

हक्कानी नेटवर्क पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय सोबत मिळालेली आहे. त्यांच्या इशाऱ्यावरच ही दहशतवादी संघटना अफगाणीस्तानमध्ये दहशतवाद पसरवत आहे. पाकिस्तानच्या उत्तरी वजिरिस्तानमध्ये ही दहशतवादी संघटना आरामात आपलं काम करत आहे आणि याला पाकिस्तान सरकारचा वरदहस्त आहे. अफगाणिस्तानातील अनेक हल्ल्यांमागे या दहशतवादी संघटनेचा हात आहे.

दक्षिण आशियात आपली मुळं तपासण्यासाठी इसिसने भरती सुरु केली आहे. त्यासाठी ऑनलाईन मंचावर एक प्रोपोगँडा पसरवून लोकांचा शोध घेत आहे. मालदीव आणि श्रीलंकामध्ये खासकरुन ही मोहीम जोरदार सुरु आहे.दहशतवादी संघटना महामारीचाही फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत

Protected Content