जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आरटीई) अंतर्गत २५% प्रवेश प्रक्रियेकरीता प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. या फेरीच्या प्रवेशासाठी ३ जून ही अंतिम तारीख असून पालकांनी प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केले आहे.
आटीई अंतर्गत सन २०२२-२३ च्या शैक्षणिक वर्षाकरिता जळगाव जिल्ह्यात एकूण ५९४ विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी जाहीर झालेली आहे. त्यापैकी ३१ मेपर्यंत ३२७ प्रवेश अंतिम झाले आहेत. या फेरीच्या प्रवेशासाठी दि. ३ जून २०२२ अंतिम तारीख असून प्रवेश घेण्याचे राहिलेल्या पालकांनी गटसाधन केंद्र पंचायत समिती व जळगाव शहरासाठी मनपा शिक्षण मंडळाचे कार्यालय येथे त्वरित संपर्क साधून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केलेले आहे.