आयकर भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आयकर भरण्यासाठीच्या कालावधीत वाढ केली आहे. आयकर भरण्यासाठी केंद्रानं आधी ३० नोव्हेंपर्यंत कालावधी निश्चित केला होता. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे करोना व लॉकडाउनमुळे आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या करदात्यांना दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयानं वैयक्तिक आयकरदात्यांना २०१९-२० या वर्षातील कर भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून दिली आहे. मंत्रालयानं शनिवारी ही माहिती दिली. आयकर भरण्यासाठी यापूर्वी ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख होती.

केंद्र सरकारनं १३ मे रोजी आयकर भरण्यासाठी निश्चित केलेली ३१ जुलैपर्यंतची तारीख वाढवून ३० नोव्हेंबर केली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं त्यावेळी असं म्हटलं होतं की, कोरोना संकटामुळे करदात्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंतच्या कालावधी वाढवण्यात येत आहे.

Protected Content