अमळनेरच्या वेस (दगडी दरवाजा) चे भूमिपूजन

 

अमळनेर : प्रतिनिधी । येथील बहुचर्चित वेस (दगडी दरवाजा) चे भूमिपूजन २४ तारखेला सकाळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते व अमळनेरच्या लोकनियुक नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आले

 

अमळनेर वेस (दगडी दरवाजा) हे संरक्षित स्मारक राज्य सरकारकडून घोषित करण्यात आले होते. कृषिभूषण साहेबराव पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी वेस (दगडी दरवाज्याच्या) स्मारक दुरुस्तीबाबत पाठपुरावा केला होता,त्यावेळी सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग यांनी दखल घेत २९ मे २००९ रोजी देखभाल व दुरुस्तीबाबत काही अटींवर परवानगी दिली होती.

दगडी दरवाजाचा पूर्वेकडील बुरुज २४ जुलै २०१९ रोजी पावसामुळे क्षतिग्रस्त झाला होता, त्यामुळे तात्पुरती गोण्यांची व्यवस्था करण्यात आली,परंतु भविष्यात हा क्षतीग्रस्त भाग पुन्हा कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक इतर रस्त्यावरून वळवण्यात आली होती.
या संरक्षित स्मारकाचे जतन दुरुस्ती कामाऐवजी स्मारकाचे महत्व जतन करून शहरातील वाहतुकीची कायम कोंडी सोडवण्यासाठी नगरपरिषद विकास योजनेनुसार वेस देखरेख व दुरुस्तीकरिता नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यासाठी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या मागणीनुसार,अमळनेर नगरपरिषदेने ७ जानेवारी २०२० रोजी विशेष सभेत ठराव करून तसा प्रस्ताव नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केलेला होता.
त्यानुसार दगडी दरवाजा संरक्षित स्मारकाच्या यादीतून वगळण्यात यावे ही लोकप्रतिनिधींची मागणी मान्य करून तो नगरपरिषदेकडे हस्तांतरण करण्याचे १९ मार्च २०२० च्या पत्रात प्रस्तावित होते

कोरोनाच्या प्रभावामुळे शासनाच्या अधिकाऱ्यांसमोर स्मारकाचे सादरीकरण करण्यास अडचणी येत होत्या, म्हणून स्मारकाच्या हस्तांतरणाची अधिसूचना रद्द करून,२६ जून २०२० च्या शासन निर्णय अन्वये पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालक यांनी नगरपरिषडेकडे संगोपणार्थ १० वर्षासाठी देण्याची परवानगी दिली आहे.

अमळनेर नगरपरिषद यांनी २२ ऑक्टोबररोजी वेस (दगडी दरवाजा) दुरुस्ती व संवर्धनाच्या कामाचे आदेश ठेकेदार अमन कन्स्ट्रक्शन यांना रक्कम १ कोटी १२ लाख ९९ हजार २७३ रुपयेप्रमाणे ठेका आता दिला आहे

या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष बिजू लांबोळे, नगरसेवक मनोज पाटील, नरेंद्र संदनशिव, संजय पाटील, निशांत अग्रवाल, विवेक पाटील, रवि पाटील, बाबू साळुंखे, यनेश्वर पाटील, दीपक पाटील, साखरलाल महाजन, बबली पाठक, प्रताप शिंपी व इतर नगरसेवक तसेच योगेश मुंदडे, विनोद भय्या, विक्रांत पाटील, हरी वाणी, रणजित शिंदे, संदीप घोरपडे, सुभाष चौधरी, संतोष लोहेरे, पिंगळे डॉक्टर, भागवत गुरुजी, कमल दलाल, शेखा हाजी, फय्याज पठाण, सत्तार तेली, सुरेश पाटील, एल.टी.पाटील, ठेकेदार चेतन शहा, चेतन सोनार, मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.यावेळी अमळनेर नागरी हित समितीतर्फे अशोक पवार व राजे संभाजी मित्र मंडळाचे पंकज चौधरी यांनी कृषिभूषण साहेबराव पाटील व पुष्पलता पाटील यांचा सत्कार केला.

दगडी दरवाजा नगरपरिषदेला देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरित करण्याकामी आमदार अनिल पाटील, तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, प्रांत सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ आदींचे सहकार्य लाभले.

या कामासाठी १ कोटी १२ लाख, ९९ हजार २७३ रुपये प्रस्तावित आहेत .नगरपालिकेच्या तिजोरीवर भार पडणार असला तरी आमदार अनिल पाटील यांनी ५० लाखापेखा जास्तीचा निधी शासनाकडून आणण्याचे मान्य केले आहे, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातील हा एक प्रकल्प आहे.खऱ्या

Protected Content