चोरटया मार्गाने गौण खनिज वाहतूक ; डंपरसह दोन ट्रॅक्टर पकडले

 

यावल : प्रतिनिधी । तालुक्यात विविध ठिकाणी महसुल प्रशासनाव्दारे करण्यात आलेल्या कारवाईत चोरटया मार्गाने गौण खनिज वाहतुक करणाऱ्या एका डंपरसह दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे .

२२ ऑक्टोबर रोजी फैजपुर शहरात बामणोद म्हैसवाडी रस्त्यावर ट्रॅक्टर (क्रं- एमएच १९ ए एन ४०२८) द्वारे अवैध गौण खनिज वाहतुक करतांना बामणोद क्षेत्राचे तलाठी यांनी पकडले , २३ ऑक्टोबर रोजी रात्री यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सचिन जगताप , स्वपनिल तायडे (तलाठी ) यांच्या पथकाने कोळन्हावी येथील एमएच १९ झेड४१६३ क्रमांकाच्या डंपरला विनापरवाना वाळु वाहतुक करतांना पकडले २ २ ऑक्टोबर रोजी भालोद येथील मंडळ अधिकारी एम पी देवरे व तलाठी दिपक गवई , पाडळसा येथील भुषण चौधरी , भालोदचे निलेश धांडे , देशभ्रतार यांनी फैजपुर शहरात ट्रॅक्टर (क्रं एमएच १९ पी १७८०) मधून विनापरवाना गौण खनिज वाहतुक करतांना पकडले या वाहनांच्या मालकांकडून चार लाख रूपयांपर्यंत दंड वसुलीची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले

Protected Content