आनोरा हायस्कूलात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

dharangaon

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आनोरा येथील कै.बी.जे. महाजन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयाचे सखोल ज्ञान मिळावे यासाठी दरवर्षी त्या-त्या विषयाचे तज्ञ शिक्षकांना शाळेत आमंत्रित केले जाते.

मागील वर्षाप्रमाणे यावर्षी इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी बालकवि ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई कुडे माध्यमिक विद्यालय, धरणगाव येथील इंग्रजी विषयाचे तज्ञ शिक्षक आर.डी. महाजन यांना आमंत्रित करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना 12 ते 5 या पाच तासात इंग्रजीचे लेखन कौशल्य, व्याकरण पाठ्यपुस्तक उतारा, बाहेरील उतारा याविषयी सखोल ज्ञान दिले. विद्यार्त्यांचा प्रतिसाद उत्साहपूर्ण होता. सरांच्या इंग्रजी सारखा कठीण विषय सोपे करून शिकावन्याच्या पद्धतिचे आनोरा शाळेचे मुख्याध्यापक एम.एच. चौधरी, बी.आर. महाजन, ए.के. पाटील, आर.बी. महाले यांनी कौतुक केले व आभार मानले व दर वर्षी आपण मार्गदर्शनसाठी येत जावे अशी विनंती देखील केली.

Protected Content