पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन

जळगाव प्रतिनिधी । कोरानाचा प्रादुर्भाव हा वाढतच असल्याने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकाने घेतला आहे. असे असतांना शैक्षणिक वर्षाचे कोणतेही नुकसान होणार नाही यासाठी केसीईचे शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहे.

सप्टेंबरपर्यंत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू होणार नसल्याने मुलांचा अभ्यास कसा व किती घ्यायचा हा प्रश्न पालकवर्गांसमोर आहे. विद्यार्थ्यांसह पालकांची हीच अडचण ओळखत केसीई सोसायटीचे शालेय विभागाचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी फोनसह व्हॉटस्ॲपच्या चा वापर करत दररोज ८ ते १० व सायंकाळी ६ ते ७ या वेळेत मोफत मार्गदर्शन करणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं मिळाली असल्याने त्यातील काही भाग तसेच ‘गृहकृत्य हाच गृहपाठ’ ‘कथावाचत’ ‘भावाबहिणींनी एकमेकांना शिकवणे’ ‘खेळातून शिक्षण’ तसेच प्रकट वाचनाचे फायदे याद्वारे मोबाईल क्रमांक (9890476547) संवाद साधणार आहेत. तेव्हा या मोफत मार्गदर्शनाचा सर्व माध्यमातील विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रकांत भंडारी यांनी केले आहे.

Protected Content