एमएम कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरण मंडळाचे उद्घाटन

mm clg

पाचोरा प्रतिनिधी । येथील एमएम कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरण मंडळाचे उद्घाटन दि. 6 सप्टेंबर रोजी सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्नील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, “अलीकडच्या काळात पर्यावरण संतुलन कमालीचे बिघडले असून त्यास मानव जबाबदार आहे. आपण पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जागृत राहणे गरजेचे आहे. कारण पर्यावरण सांभाळले, तरच मानव जात टिकेल. हे थांबवायचे असेल तर पर्यावरण टिकवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. स्वप्नील पाटील यांनी महाविद्यालयात पर्यावरण मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी बोलले.

डॉ.स्वप्नील पाटील पुढे म्हणाले की, यांनी पर्यावरण व मानवी आरोग्य यांचा निकटचा संबंध स्पष्ट करून मानवाच्या चुकीमुळेच पर्यावरण धोक्यात येत असल्याबाबत विविध उदाहरणे दिली. विद्यार्थीमध्ये अनेक आजारांची लागण होण्याचे प्रमाण वाढत असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे आताच सावध होऊन आपापल्या परीने पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. याचबरोबर प्राचार्य डॉ.बी.एन पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ. बी.एन. पाटील अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य शरद पाटील, पर्यवेक्षक प्रा.जी.बी पाटील, प्रा.डॉ.जितेंद्र बडगुजर, पर्यावरण मंडळ प्रमुख प्रा.डॉ.शैलजा पाटील हे उपस्थितीत होते. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून या मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पर्यावरण मित्र समिती घोषित करण्यात आली. तसेच या समितीच्या सदस्यांना सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने टी-शर्ट व कॅप देण्यात आले. पर्यावरण संतुलन अबाधित ठेवण्याबाबत शिक्षक व विद्यार्थ्यांनी सामुहिक संकल्प केला.

कार्यक्रमास प्रा.नितीन पाटील, प्रा.प्रदीप देसले, प्रा.स्वप्नील ठाकरे, प्रा.सुनीता गुंजाळ, सुनिता सोहत्रे, प्रा.छाया पाटील, प्रा.मनीषा चव्हाण, प्रा.वासंती चव्हाण, प्रा.गिरीषचंद्र पाटील, प्रा.गौरव चौधरी, प्रा.एम.ए.माळी, प्रा.एस.आर पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते. प्रा.डॉ.शैलजा पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा.अतुल सूर्यवंशी आणि प्रा.एस.आर.पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.गिरीशचंद्र पाटील यांनी आभार मानले.

Protected Content